31 डिसेंबरचा मुहूर्त साधत दारूच्या दुकानात घुसले अन ..

Spread the love

चोरीचा एक अद्भुत प्रकार परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात समोर आलेला असून स्टेशन रोडवरील एका वाईन शॉपची भिंत पाठीमागून फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स पळवलेले आहेत. शुक्रवारी हा प्रकार घडला असून चोरी झालेल्या मालाची किंमत जवळपास पाच लाख रुपये असल्याचे समजते.

सेलू स्टेशन रोडवर एस भुतडा यांचे वाईन शॉप आहे. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंत शुक्रवारी रात्री फोडली आणि त्यानंतर महागड्या विदेशी दारूचे बॉक्स दुकानातून लंपास केले. नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी व्यवस्थापक आलेले असताना त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले दिसले त्यानंतर पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली त्यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून त्यानंतर भिंत पाडली आणि दारूचे बॉक्स लंपास केले असे दिसून आले आहे.

31 डिसेंबर चा मुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणात व्यावसायिक यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानात दारू आणून ठेवलेली होती मात्र चोरट्यांनी लाख रुपये किंमतीची दारू रातोरात लंपास केली त्यामुळे व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सीसीटीव्ही देखील फोडलेले असल्याने या प्रकरणाचा तपास लावणे पोलिसांसाठी देखील आव्हानात्मक ठरणार आहे.


Spread the love