शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना उघडकीला आलेली असून एका पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापक असलेल्या व्यक्तीने या एचआर विभागात काम करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीकडे चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. मुंढवा परिसरात ही घटना उघडकीला आली असून आरोपी व्यवस्थापक असलेल्या व्यक्ती आणि इतर दोन जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
उपलब्ध माहितीनुसार, 25 वर्षीय फिर्यादी तरुणीही मुंढवा परिसरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर प्रतिनिधी म्हणून काम करते. आरोपी व्यक्ती हा याच हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असून गेल्या सप्टेंबरमध्ये महिन्यांपासून तो तिला तिच्या कॅबिनमधे त्याच्या केबिनमध्ये बोलावून तू खूप सुंदर दिसतेस.. तुझे पाय किती भारी आहेत. माझे घर खूप मोठे आहे माझ्या घरी चल तिथे आपण मजा करू , असे म्हणून तिच्यासोबत तो अश्लील संभाषण करत असायचा.
दुसऱ्या आरोपीने त्याने जे काही तुझ्यासोबत केलेले आहे ते तू इतर कुणाला सांगायचे नाही नाहीतर आम्ही तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला आणि घरी कोणाला काही सांगशील तर तुझ्यासोबत तुझ्या कुटुंबियांना देखील संपवून टाकेल अशी देखील धमकी तिला देण्यात आली.पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून मुंढवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.