महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती इथे उघडकीस आली आहे .बारामती पोलिसांनी गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे तर महिला एंजटला अटक केली आहे. बारामती पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली त्यावेळी अचानक झालेल्या या धाडीने अनेक जणांची चांगलीच पळापळ झाली.
बारामती शहरातील भाजी मंडई इथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याती माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली आणि पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवला. डमी ग्राहकासोबत सौदा फिक्स झाल्यावर त्याने पोलिसांना इशारा केला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बारामती पोलिसांनी महिला एजंटला अटक करुन तिच्याकडून रोख रक्कम आणि मोबाइल फोन जप्त केला आहे.