पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून आत्तापर्यंत आपण सोशल मीडियावर आपले स्टेटस अपडेट केल्यानंतर घरी दरोडा टाकण्याचा प्रकार पाहिले असतील मात्र एक वेगळाच असा प्रकार यावेळी पुण्यात समोर आलेला आहे. आपला मुलगा इतरत्र शिकतो अशी माहिती एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केली होती त्यानंतर एका व्हाइट कॉलर गुन्हेगार याने याउद्योजकाला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, किरण रामदास बिरादार ( राहणार मांजरी पोस्ट आवड कोंडा तालुका उदगीर) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 52 वर्षे उद्योजक यांनी सोशल मीडियावर आपला मुलगा इतरत्र शिकत असल्याची माहिती दिली होती. कोलकत्ता येथे त्यांचा मुलगा शिकत असून त्यांनी त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकलेली होती. आरोपीने त्यांचा व्हाट्सअप नंबर मिळवला आणि त्यानंतर त्यांना व्हाट्सअप कॉल करून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर कोलकत्ता येथे शिकत असलेल्या तुमच्या मुलाला ठार मारेल असे देखील त्याने मेसेज पाठवले त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने त्याच्यासाठी सापळा रचला.
पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे तक्रारदार उद्योजक यांनी त्याला खंडणी देण्याची तयारी दाखवली आणि त्यासाठी दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा देखील जमा केल्या. आरोपीने सांगितल्याप्रमाणे डेक्कन येथील गरवारे पुलाखाली झुडपात पैशाची बॅग ठेवा आणि निघून जा असे आरोपीने सांगितले होते त्यानुसार त्यांनी ही बॅग ठेवली मात्र पोलिसांनी देखील आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. बॅग घेण्यासाठी तो आला त्याचवेळी पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक येवले करत असल्याची माहिती आहे .