पुण्यातील गुंडाचा ऑडी कारमध्ये मृतदेह , दोन जण ताब्यात

Spread the love

पुणे येथील एका खळबळजनक हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आलेले असून तळेगाव दाभाडे येथील संजय कारले या व्यक्तीचा ऑडी कारमध्ये आढळून आलेला होता. 45 दिवसानंतर पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना बेड्या ठोकलेल्या असून मोहसीन मुलानी आणि अंकित कांबळे अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत . प्राथमिक माहितीनुसार पैशाच्या देवाणघेवाणीतून आणि सोन्याच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 18 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई गोवा हायवे जवळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कारमध्ये मावळ येथील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( राहणार अनिकेत अपार्टमेंट यशवंत नगर तळेगाव दाभाडे ) याचा मृतदेह खळबळजनक परिस्थितीत आढळून आलेला होता.

स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गाडीच्या नंबरवरून आरोपी पुणे येथील असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी कमी किमतीमध्ये जास्त सोने देतो असे सांगून साडेपाच लाख रुपये आरोपी मयत कारले याने आरोपींकडून घेतलेले होते मात्र त्यानंतर भेटायला आल्यावर त्याने पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली आणि कोणतेही सोने दाखवले नाही त्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी त्याचा गोळी झाडून खून केला.

संशयित आरोपी हे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून कारले याचा खून केल्यानंतर दोघेही सातारा त्यानंतर बंगळुरू आणि पुढे नेपाळ येथे पळून गेले होते. काही कालावधीनंतर ते पुन्हा पुण्यात आले त्यावेळी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. संजय कारले याच्या विरोधात याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असून तो वैद्यकीय रजेवर बाहेर आलेला होता आणि काही कालावधीत त्याला जामीन देखील मिळाला त्यानंतर हा त्याने हा प्रकार केला मात्र त्यात त्याला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.


Spread the love