एक प्रेयसी अन दोन प्रियकर, एकाच वेळी तिच्या घरी पोहचले अन..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे समोर आली असून एका प्रियकरासोबत ब्रेकअप करून अवघ्या काही दिवसात दुसऱ्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे. आदित्य बर ( वय 22 ) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी ललित संतोष उज्जैनकर ( वय 22 ) या मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणात इतर तीन जणांचा देखील समावेश असून उर्वरित आरोपी अद्याप हाती आलेले नाहीत.

उपलब्ध माहितीनुसार, किरण सोनवणे ( वय 19 ) असे या तरुणीचे नाव असून दिवा येथे तिच्या भावासोबत राहत होती . मुख्य संशयित असलेला ललित हादेखील या परिसरातच राहतो. काही दिवसांपासून किरण आणि ललित यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले मात्र काही कालावधीतच त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर किरण हिने आदित्य नावाच्या तरुणासोबत मैत्री केली त्यामुळे ललित याचा आदित्य याच्यावर राग होता.

किरण हिच्या भावाकडे हे कुत्रा असून हा कुत्रा ललित याच्याकडे काही दिवस राहत होता. कुत्रा नेण्यासाठी म्हणून शनिवारी रात्री किरण ही आदित्यला सोबत घेऊन ललित त्याच्याकडे आली होती त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या ललित याने काही साथीदारांना तात्काळ बोलावत आदित्य याला मारहाण केली त्यात आदित्य याचा जागीच मृत्यू झाला.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्हा घडल्यानंतर फरार झालेल्या ललित याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर त्याचे इतर साथीदार अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


Spread the love