महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून प्रेमप्रकरणातून एका जिवलग मित्राने दुसऱ्या जिवलग मित्रावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गोरेगाव भागात ही घटना घडलेली आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
उपलब्ध माहितीनुसार, जयेश सावंत असे जखमी व्यक्तीचे नाव असून आयुष खेडकर असे अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. गोरेगाव परिसरातील पाटकर महाविद्यालयात हा प्रकार घडलेला असून दोघेही तरुण एका तरुणीच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. आपली आवडती मुलगी ही आपलीच पत्नी व्हावी यासाठी त्यांची धडपड होती मात्र त्यांच्यातच वाद झाले आणि अखेर या प्रकरणाचा खळबळजनक असा शेवट झाला.
जयेश याला आपल्या प्रेमाच्या मार्गातून दूर करण्यासाठी आयुष याने कोयता खरेदी केला आणि त्याकडे त्याने आपल्या जिवलग मित्रावर वार केले. सदर हल्ल्यात आयुष हा गंभीर जखमी झालेला असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कोयता जप्त केलेला असून आरोपी व्यक्तीला देखील बेड्या ठोकलेल्या आहेत. तरुणीची नक्की भूमिका काय होती हे अद्यापही समोर आलेले नाही.