महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना जालना जिल्ह्यातील परतूर परिसरात समोर आलेलली असून कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आलेला आहे. देवगाव खवणे येथील हा प्रकार असून रविवारी ही घटना उघडकीला आली.
उपलब्ध माहितीनुसार , मारुती आसाराम वाघमारे ( वय 28 ) असे मयत तरुणाचे नाव असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार तसेच सावकारीच्या वादातून त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. तब्बल दहा जणांच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यातील पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.
संशयित आरोपींनी जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून आणि सावकारकीच्या वादातून मारुती वाघमारे यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह विहिरीत टाकून दिला असा आरोप मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला असून परतुर पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी मुख्य संशयित राजाभाऊ विठ्ठल खवणे, प्रभू विठ्ठल खवणे, ज्ञानेश्वर खवणे, विठ्ठल खवणे, किसन मोरे, पवन मोरे, परमेश्वर मोरे, पप्पू मोरे, आकाश मोरे, विवेकानंद मोरे अशी आरोपींची नावे असून 29 नोव्हेंबरपासून मारुती वाघमारे हे बेपत्ता झालेले होते. तब्बल एक महिन्यांनी त्यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे.