देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून बंगळूर येथे शारीरिक सुखाची मागणी नाकारल्यानंतर ब्युटीशियन असलेल्या एका महिलेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ तिच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी 47 वर्षीय सोनार व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले आहे.
शनिवारी समर परमाईक या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. पश्चिम बंगाल येथील एक महिला ब्युटिशियन कोर्ससाठी बंगळूर येथे आलेली होती. परमाईक हा ब्युटीपार्लरचा नियमित ग्राहक होता त्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याने तिला डान्सबारमध्ये काम करण्यास देखील सांगितले आणि त्या काळात तिचे काही फोटो आणि व्हिडिओ त्याने तिच्याकडून मागून घेतले.
काही काही कालावधीनंतर ही महिला तिच्या मूळ राज्यात निघून गेली आणि त्यानंतर तिने लग्न केले आणि पतीसोबत पुन्हा बंगळूर इथे आली. परमाईक हा तिच्याकडे सतत शारीरिक सुखाची मागणी करत असायचा मात्र तिने त्याला नकार दिला म्हणून त्याने तिचे व्हिडिओ आणि फोटो तिचे मित्र आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर केले. महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.