कोंढव्यातील ‘ त्या ‘ जबरी चोरीचे कारण ऐकून पोलिसही चकित

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून हा प्रकार पुण्यात उघडकीला आलेला आहे. कोंढवा परिसरात काही दिवसांपूर्वी एक जबरी चोरी झालेली होती. नाताळ साजरा करण्यासाठी एक कुटुंब गेलेले होते त्यानंतर त्यांच्या घरात असलेले तब्बल 37 लाख रुपये एका व्यक्तीने पळवलेले होते. खिडकीला लावलेले ग्रील त्याने तोडले आणि त्यानंतर घरातील ही रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने घेऊन त्याने पलायन केले होते.

कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रारदार बबीता डिसूजा यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि एका तरुणाला बेड्या ठोकल्या मल्लाप्पा होसमाणी ( वय 31 ) असे आरोपीचे नाव असून स्थानिक पोलिसांसोबत युनिट पाचकडे या घटनेचा तपास करण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एक संशयित आरोपी आढळून आल्यानंतर त्याच्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने चोरीचे जे काही कारण सांगितले ते ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले.

मल्लाप्पा याने आपण दागिने आणि रक्कम चोरल्याची कबुली दिलेली असून आपला प्रेमविवाह झालेला होता त्यामुळे घरच्यांनी आम्हाला दोघांनाही घरातून हाकलून दिले. घराबाहेर पडल्यानंतर कुटुंबाची उपजीविका करणे तसेच स्वतःसाठी घर घेणे आम्हाला गरजेचे होते त्यामुळे आपण घरफोडी करण्याचा प्लॅन बनवला होता असे सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 37 लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत.


Spread the love