सोशल मीडियावर सध्या एका प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून बीएसएफमधील रिटायर्ड अधिकारी असलेल्या एका पतीने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलच्या खोलीमध्ये रंगेहात पकडलेले आहे. महिलेचा प्रियकर हा देखील लष्करामध्ये कार्यरत असून बुधवारी रात्री रिटायर्ड अधिकारी मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने या दोघांनाही रंगेहात पकडले.
उत्तराखंड येथील रूडकी येथील हा प्रकार असून त्यानंतर हॉटेलमध्ये बराच वेळ गोंधळ उडालेला होता. आपल्या पत्नीचे अनेक जणांसोबत अनैतिक संबंध असल्याचा देखील या पतीने दावा केलेला असून आपल्याकडे ती इतरांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडे आहेत असे देखील म्हटलेले आहे.
रूडकी येथे गंगनगर येथील एका हॉटेलमध्ये बीएसएफ मधून निवृत्त झालेले अधिकारी सुधीर हे त्यांच्या काही सहकार्यांसह हा प्रकार पकडण्यासाठी पोहोचले होते. दरवाजा उघडताच हे अधिकारी सुधीर आणि त्यांचे मित्र खोलीमध्ये पोहोचले त्यावेळी सुधीर यांची पत्नी एका जवानासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत बेडवर आढळून आली त्यामुळे हॉटेलमध्ये गोंधळ झाला आणि सुधीर आणि त्यांच्या मित्रांनी याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला.
हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला त्यावेळी सुधीर हे त्यांच्या पत्नीवर धक्कादायक आरोप करत होते त्यामध्ये त्यांनी तिचे केवळ याच व्यक्तीसोबत नव्हे तर इतरही अनेक जणांसोबत अनैतिक संबंध आहेत. मी तिला विरोध केला त्यावेळी तिनेच मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र आज मी तिला रंगेहाथ पकडलेले आहे. तिचे असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे असून ती वेगवेगळ्या पुरुषांसोबत व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत असेही म्हटलेले आहे. 2017 मध्ये विवाह झाल्यानंतर मी तिच्यापासून वेगळा राहत होतो आणि माझी घटस्फोटाची कोर्टात केस सुरू आहे असेही त्यांनी म्हटले आहे.