देशात एक अत्यंत खळबळ जनक अशी घटना गुजरातमधील राजकोट येथे समोर आलेली असून सतत रडत असल्याने अडीच वर्षाच्या मुलीला आपटून तिच्या सावत्र बापाने तिची हत्या केलेली आहे त्यानंतर त्याने तिचा मृतदेह छातीला लावून घेऊन जात एका झुडपात फेकून दिला. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे त्यामध्ये तो या मुलीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमित गोर असे आरोपीचे नाव असून त्याची सावत्र मुलगी ही अडीच वर्षाची असून ती शुक्रवारी दुपारी तिच्या आईकडे जाण्याचा हट्ट करत होती. अमित याने त्याला नकार दिला त्यानंतर ती रडू लागली मात्र ती शांत होत नसल्याने त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले आणि त्यात तिचा मृत्यू झाला नाही म्हणून चक्क गळा आवळून खून केला. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या मुलीची आई ही एका कारखान्यात कामाला जात होती तर आरोपी हा घरीच बसून रहायचा.
मुलीची हत्या केल्यानंतर त्याने तिला खांद्यावर घेत तिचा मृतदेह एका झुडपात फेकून दिला आणि जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात घरी देखील परतला पत्नी घरी आल्यानंतर त्याने ती बेपत्ता झाली असल्याची माहिती तिला दिली आणि तिला सोबत घेऊन पोलिसात देखील फिर्याद नोंदवली मात्र पोलीस तपासात हा प्रकार त्यानेच केल्याचे समोर आलेले असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.