भाडेकरूच निघाला मालकिणीचा प्रियकर पण ‘ उशीर ‘ झालेला होता अन..

Spread the love

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना श्रीरामपूर तालुक्यात समोर आलेली असून एका पत्नीने तिचा प्रियकर असलेल्या उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्यात सोबत कट रचून स्वतःच्याच पतीची पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केलेली आहे. त्यांचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या पत्नीने आपल्याच पतीकडून भरभक्कम रक्कम देखील हडपली आणि घर देखील स्वतःच्या नावावर करून घेतले.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी प्रियकर आणि पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला असून विकास बाबासाहेब कठाळे असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत त्याच्या प्रेयसीचा देखील समावेश आहे. आपल्या पत्नीने लाखो रुपयांची फसवणूक केली असे सांगत महिलेच्या पतीने पोलिसात धाव घेतली होती फिर्यादी व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत शहरात अनेक वर्षांपासून राहत असून पत्नीने पतीचा विश्वास संपादन केला आणि घराची जागा स्वतःच्या नावावर करून घेतली त्यानंतर तिथे बंगला देखील बांधून घेतला आणि बंगल्यात भाडेकरू म्हणून स्वतःच्याच प्रियकराला जागा दिली. 2019 मध्ये महिलेचा प्रियकर हा तिथे राहायला देखील आला.

तिथे राहायला आल्यानंतर त्याने तक्रारदार यांच्या पत्नीसोबत कधी जेवण तर कधी पाणी याचा बहाना करत जवळीक साधण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला मूलबाळ असून अधिकाऱ्याने कधी चॉकलेटचा बहाना करत तर कधी चित्रपटाला घेऊन जाण्याचा बहाना करत घरात शिरकाव केलेला होता ही बाब आपल्याला लक्षात आली त्यानंतर आपण पत्नीला या संदर्भात जाब विचारला त्यावेळी तिने जी भूमिका घेतली ती आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक होती असे पतीचे म्हणणे आहे.

पतीने म्हटल्याप्रमाणे आरोपी व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत काढलेले काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचे आपल्याला धमकी दिली आणि त्यानंतर आपल्याला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्नीला हा प्रकार कानावर घातला त्यावेळी तिने देखील पोलिसात जाण्यास नकार दिला आणि त्याला पैसे देऊन विषय मिटून टाका असे सांगितले. आपण मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पाच लाख रुपये त्यांना दिले आणि या अधिकाऱ्याच्या सासऱ्याला या प्रकाराची कल्पना दिली मात्र त्यांनी देखील दुर्लक्ष केले आणि अखेर पतीने पोलिसात धाव घेतली त्यानंतर तिने एका रात्रीत अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला सध्या ती या अधिकाऱ्यासोबत राहत आहे असे पतीचे म्हणणे असून पोलिसांनी प्रकाराला प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.


Spread the love