मुस्लिम बांधवाच्या ‘ त्या ‘ निर्णयाचे सर्व समाजातून कौतुक

Spread the love

देशात सध्या धार्मिक ध्रुवीकरण चांगलेच चर्चेत आलेले असून अशा व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घालणारी एक बातमी परभणी येथून समोर आलेले आहे. परभणी येथील एका मुस्लिम समाज बांधवाने शिवपुरान कथेच्या आयोजनासाठी आपली जमीन देण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

परभणी येथे 13 ते 17 जानेवारी या कालावधीत शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिष्रा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. चार दिवस हा सोहळा सुरू राहणार असून त्यासाठी किमान शंभर एकरपेक्षा अधिक जागेची गरज होती . परभणी येथील हाजी शोयब यांनी या सोहळ्यासाठी साठ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतलेला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व समाज बांधवांकडून कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love