डोक्यात ‘ नको ते ‘ खूळ शिरलं अन पत्नीसोबत मुलाचाही केला खून

Spread the love

महाराष्ट्रात सध्या एक खळबळजनक असे प्रकरण औरंगाबाद इथे समोर आलेले असून शहरातील कांचनवाडी परिसरात दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीला आलेला आहे. एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून त्याची पत्नी आणि अडीच वर्षाची मुलगी यांचा मोबाईल चार्जरच्या वायरने आणि नायलॉन दोरीने गळा आवळून खून केलेला असून त्यानंतर त्याने स्वतःहून पोलिसांना या प्रकाराची खबर दिली.

उपलब्ध माहितीनुसारमी, समीर मस्के ( वय 30 ) असे आरोपीचे नाव असून त्याने त्याची पत्नी असलेली आरती मस्के ( वय 25 ) आणि त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा यांचा त्याने गळा आवळून खून केलेला आहे. कांचनवाडी परिसरात तो त्याची पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा यांच्यासोबत राहत होता. पत्नीवर सतत समीर हा संशय घेत असायचा आणि त्यातून त्यांचे वाद होत होते. रविवारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर अडीच वर्षाचा मुलगा निशांत याचा त्याने आधी खून केला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचाही गळा आवळला . स्वतःहून 112 नंबर वर फोन करून त्याने आपण हा प्रकार केल्याचे सांगितले त्यानंतर सातारा पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत.


Spread the love