पुण्यात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या दिघी परिसरात एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आपल्या मुलावर अतिरिक्त दबाव टाकला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप करत मयत मुलाच्या नातेवाईकांनी दिघी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवला आणि त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले.
उपलब्ध माहितीनुसार , वृषभ मुकुंद जाधव असे मयत तरुणाचे नाव असून पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दमदाटी केल्याचा आरोप देखील मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. ऋषभ आणि त्याची पत्नी यांच्यात सतत भांडणे होत असल्याने त्यांनी पत्नीच्या विरोधात घटस्फोटाची केस कोर्टात दाखल केली होती आणि हा निकाल पत्नीच्या बाजूने लागला. पत्नीला घरी राहण्यास द्यायचे आणि पैसे द्यायचे असा पर्याय न्यायालयाने वृषभ यांना सांगितला त्यानंतर ते घरी निघून आले.
काही वेळाने पत्नी तिच्या नातेवाईकांना घेऊन ऋषभ यांच्या घरी आली त्यावेळी पत्नी आणि वृषभ यांच्यात पुन्हा बाजाराची झाली त्यानंतर ऋषभ यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आपल्या मुलावर दबाव टाकला त्यामुळे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून दोषी व्यक्तींवर कारवाईची मागणी केलेली आहे. पोलिसांकडून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे