बायकोला नोटीस तर तिचा घटस्फोटाचा अर्ज, जावई सासुरवाडीला आला अन..

Spread the love

एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या सांगली जिल्ह्यात समोर आलेले असून बायकोला सासरी पाठवत नसल्याने जावयाने चक्क कोयत्याने सासऱ्याच्या डोक्यावर मानेवर वार करत त्याचा खून केलेला आहे. तब्बल 18 वार केल्यानंतर सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जावयाने तिथून पळ काढला मात्र या जावयाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आप्पासाहेब अण्णाप्पा मल्हार ( वय 46 राहणार जत ) असे मयत व्यक्तीचे नाव असून शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. त्यांचा जावई कर्नाटक येथील रहिवासी असून सचिन रुद्राप्पा बळवळी असे आरोपीचे नाव आहे. तो आणि त्याचा भाऊ मिलन यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आप्पासाहेब यांची मुलगी तेजश्री हिचा विवाह सचिन याच्यासोबत 2019 मध्ये झालेला होता त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले म्हणून तेजश्री ही अखेर कंटाळून माहेरी निघून आली. सचिनने तिला सासरी पाठवण्यासाठी अथणी न्यायालयातून नोटीसही पाठवली होती मात्र तेजश्री हिने नोटीस ला प्रत्युत्तर म्हणून जत दिवाणी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केलेला होता. जावई सासऱ्यावर चिडून असल्याने तो सांगली जिल्ह्यात आला आणि त्यानंतर त्याने आपल्या सासऱ्याचा अखेर खून केला.


Spread the love