काही वर्षांपासून सोशल मीडियावर मैत्री करून त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवत नागरिकांना फसवण्याचे अनेक प्रकार उघडकीला आलेले आहेत. पुणे शहरात अशा अनेक घटना समोर आलेल्या असून महिलेचा व्हाट्सअपवर डीपी ठेवून तरुण मुलांसोबत चॅटिंग करत त्यानंतर त्यांचे न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीला आलेले आहेत. सहकारनगर येथील एका तरुणाने याच बदनामीला वैतागून आत्महत्या केलेली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये धाव घेत आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.
पुण्यातील सहकारनगर आणि दत्तवाडी येथे मागील वर्षी दोन तरुणांनी आत्महत्या केलेल्या होत्या. त्यातील एक आरोपी अन्वर खान ( राहणार गुरुकोठडी लक्ष्मण गड जिल्हा अलवर ) याला याआधीच बेडा ठोकलेल्या आहेत तर त्यानंतर दुसरा आरोपी शहाबाद खान ( राहणार रायपूर जिल्हा भरतपुर राजस्थान ) अशा दुसऱ्या आरोपीला देखील पुणे पोलिसांनी जेरबंद केलेले आहे.
राजस्थान येथे अशाच पद्धतीने कार्यरत असणाऱ्या अनेक टोळ्या असून देशभरातील विविध व्यावसायिक आणि तरुण मुले यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज करून त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलचा अभ्यास करून त्यानुसार ही टोळी मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढते . हळूहळू त्यांच्यासोबत बोलणे सुरू केल्यानंतर अंदाज घेऊन त्यांना या जाळ्यात अडकवण्यात येते. सोशल मीडियावर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणाची आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच ती स्वीकारावी आणि त्यानंतरच या व्यक्तीशी संभाषण सुरू करावे अशी अनेक आवाहने पोलिसांकडून याआधी देखील केली गेलेली आहेत मात्र अनेकदा मोह आवरत नसल्याने नागरिक या टोळ्यांच्या जाळ्यात सापडत आहेत.