एका मैत्रिणीच्या माध्यमातून कॉलगर्ल असलेल्या एका तरुणीच्या जाळ्यात अडकणे एका 41 वर्षीय कंत्राटदाराला चांगलेच महागात पडलेले आहे. तिच्यासोबत राहण्यासाठी हा कंत्राटदार जास्तच आसुसलेला होता मात्र तरुणीने त्याचा फायदा घेत त्याला तब्बल 33 लाख रुपयांना चुना लावलेला आहे. आरोपी कॉलगर्ल हिने चक्क तिच्या पतीच्या मदतीने त्यांच्यातील संबंधाचे व्हिडिओ कुटुंबीयांसोबत शेअर करण्यात येतील अन कंत्राटदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगत त्याच्याकडून हे पैसे उकळले. कुर्ला पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे
तक्रारदार व्यक्ती हे खोपोली येथील रहिवासी असून रस्ते बांधकामाची कंत्राटे घेतात. त्यांचे त्यांच्या मैत्रिणीसोबत सतत संभाषण होत असल्याने तिने त्यांना काजल महतो नावाच्या एका कॉलगर्लचा नंबर दिलेला होता त्यानंतर कंत्राटदार यांनी तिच्यासोबत वेळोवेळी संपर्क सुरू केला आणि आपण एका रात्रीचे 20000 रुपये घेऊ असे सांगितले. तिची ऑफर ऐकून कंत्राटदार एका पायावर तयार झाले आणि त्यांनी तिच्यासोबत एक रात्र घालवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासोबत काही रात्री घालवल्या.
पाच ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी तिला त्यानंतर 75 हजार रुपये दिले त्यानंतर तिने सोनसाखळी मागितली ती देखील दिली मात्र त्यानंतर तिने 32 लाख रुपये देखील मागितले यातील दीड लाख रुपये त्यांनी तिला दिले त्यानंतर वेळोवेळी तिने दमदाटी करत तक्रारदार व्यक्ती यांच्याकडून तब्बल 30 लाख रुपये उचलले घेतले आणि अजूनही तिची भूक भागत नसल्याने तिने दहा लाख रुपये आणखी देण्याची मागणी केली. तिचा पती हरीशंकर याने देखील तक्रारदार व्यक्ती यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली . हतबल झालेले तक्रारदार यांनी अखेर पोलिसात धाव घेतलेली असून अद्यापपर्यंत हे दांपत्य हाती आलेले नाही.