शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना सिंहगड रोड परिसरात समोर आलेली असून मुलबाळ होत नसल्याने एका महिलेला चक्क घुबडाचे पाय मानवी हाडांची पावडर खाण्यासाठी सासरच्या लोकांनी जबरदस्ती केलेली आहे तर सोबतच एका कोंबडीची आघोरी पूजा करून तिची राख तिला जेवणातून खाऊ घातली असे देखील आरोप महिलेने केलेले आहेत. पोलिसात तक्रार दिल्यानंतर सासरच्या व्यक्तींच्या विरोधात विवाहितेचा छळ नरबळी अमानुष आणि अनिष्ट अघोरी प्रथा तसेच जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, सासरच्या लोकांनी आपल्याकडे मूलबाळ होत नसल्याने वारंवार पैशाची मागणी केलेली होती त्यानंतर घरात भरभराट व्हावी आणि आपल्या घराला एकुलता एक वारसदार मुलगाच व्हावा या आशेने महिलेचे पती सासू-सासरे दीर आणि जाऊ यांनी घरात वारंवार आघोरी पूजा करण्यास सुरुवात केली. प्रत्येक अमावस्येला हे सर्वजण एकत्र जमायचे आणि तळघरात आघोरी पूजा करायचे . कोरोना काळात आर्थिक परिस्थिती खराब झाल्यानंतर त्यांनी जवळच्या स्मशानभूमीत जाऊन तिथे मयत असलेल्या व्यक्तींची हाडे जमा केली आणि त्याची ही हाडे पाण्यात भिजू घातली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी पिण्यासाठी दिले.
महिलेने पुढे म्हटले आहे की , 21 फेब्रुवारी 2021 रोजी महिलेच्या जावेच्या घरी निगडी इथे पूजा घालण्यात आली त्यावेळी मयत माणसाचे केस, हाडे आणि घुबडाचे पाय, कोंबडीचे धड हे सर्व आणून ठेवण्यात आले होते आणि तिथे एका मांत्रिकाला देखील पाचारण करण्यात आले होते . त्याने आपल्याला मानवी हाडाची भुकटी खाण्यास भाग पाडली. आपण नकार दिला असता बंदुकीच्या धाकाने आपल्याला हा प्रकार करण्यास भाग पाडले आणि तू पांढऱ्या पायाची आहेस तुला मुलं होत नाहीत असे म्हणून आपला अपमान देखील केला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.