पुणे ब्रेकिंग..’ तू कॉलेजपासून माझी फेवरेट ‘ म्हणताच विवाहिता पळत सुटली

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून ‘ तू जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हापासून माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची ‘ असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केलेले आहे. सोमवारी नऊ तारखेला दुपारी हा प्रकार घडलेला असून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मोहन गंगाधर साळवे ( वय 24 राहणार तळेगाव दाभाडे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नावातून पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे .फिर्यादी महिला यांचे यशवंत नगर परिसरात किराणा मालाचे दुकान असून त्यांच्या दुकानात मोहन हा अनेकदा यायचा त्यावेळी त्याने फिर्यादी महिला यांना जेव्हापासून तू कॉलेजमध्ये होती तेव्हापासून तू माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची असे म्हणत त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. फिर्यादी घाबरून तिथून पळाल्या त्यानंतर आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि याबाबत जर कुणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील धमकी दिली मात्र पीडित महिलेने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


Spread the love