पुण्यात फ्लॅटच्या भाड्यासाठी गेलेल्या मालकीणबाईला ‘ भलताच ‘ अनुभव

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळ जनक अशी घटना पिंपरीत समोर आलेली असून भाडे मागण्यासाठी गेलेल्या मालकिनबाईला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करण्यात आला. बोपखेल येथे ही घटना घडलेली असून 16 तारखेला 31 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला अटक केलेली असून आणखी एका महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा परिसरात एक फ्लॅट असून त्याचे भाडे मागण्यासाठी त्या आरोपी यांच्या राहत्या घरी पोहोचलेल्या होत्या त्यावेळी आरोपीने एका महिलेसोबत संगणमत करून फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने त्यांचा संताप अनावर झाला त्यानंतर तक्रारदार यांच्यासोबत आरोपीने गैरवर्तन देखील केले असे देखील त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे