मुंडावळ्या बांधून नवरदेव तयार असतानाच ‘ सुनामी ‘ आली अन ..

लग्नासाठी मांडव सजला मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जमले मात्र याच दरम्यान एक महिला तिथे पोहोचली आणि तिने ज्याच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो आधीच विवाहित असल्याची माहिती सर्वांना दिली आणि त्यानंतर मांडवात चांगलाच धिंगाणा झाला. भंडारा जिल्ह्यातील ही घटना असून महिलेच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आरोपी पतीला एक मुल असून त्याची पहिली पत्नी ही मुंबई येथील लग्न मंडपात आली होती. भंडारा जिल्ह्यातील मासळ येथील हा तरुण असून सदर प्रकरण आता कोर्टात पोहोचलेले आहे.

घरी पत्नी आणि मुलगा असताना या व्यक्तीला दुसरे लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यासाठी त्याने मुंबई येथे मुंबईजवळील कल्याणी येथे मुलगी देखील पाहिली त्यानंतर त्याचा विवाह पार पडत असतानाच त्याची पहिली पत्नी भंडारा येथून मुंबई येथून तिथे पोहोचली आणि त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

खेमराज बाबुराव मुल ( वय 40 राहणार मासळ तालुका लाखांदूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो पेंटर म्हणून काम करतो. पंधरा वर्षांपूर्वी त्याचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते आणि त्यानंतर त्याचे तिच्यासोबत लग्न देखील झाले. काही दिवसानंतर त्यांना मुलबाळ देखील झाले मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाल्यावर प्रकरण अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचले.

प्रकरण कोर्टात असतानाच त्याने दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली आणि त्यानंतर या पत्नीला याप्रकरणी माहिती मिळाली आणि ती विवाहस्थळी तिचा मुलगा भाऊ आणि बहिणीसह कल्याण पूर्व येथील दर्शन मॅरेज हॉल येथे जाऊन पोहोचली. अंगावर अक्षता पडून संसाराला सुरुवात होण्याआधी पहिली पत्नी तिथे पोहोचली आणि तिने चांगलाच धिंगाणा घातला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मुंडावळ्या बांधलेल्या या नवरदेवाला बेड्या ठोकल्या.