माधाराम अन माधीबाईच्या प्रेमात मर्यादा पार , इंस्टाग्रामवर चुंबन अन..

सोशल मीडियावर सध्या एका प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात ही घटना उघडकीला आलेली आहे . पोलीस तपासाच्या दरम्यान या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी दारूची पार्टी केली आणि त्यानंतर स्वतःचे इंस्टाग्रामवर रिल्स देखील बनवले आणि अपलोड करून त्यानंतर आत्महत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, माधाराम ( वय 25 ) आणि माधीबाई ( वय 25 ) अशी मयत दाम्पत्याची मयत प्रेमी युगलाची नावे असून बारमेर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटी गावात ही घटना घडलेली आहे. माधीबाई आणि माधाराम यांचे वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालेले होते मात्र लग्न झाल्यानंतरही त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले अशी माहिती समोर आलेली आहे. त्या दोघांनाही सध्या मुलेबाळे असून त्यांच्यातील प्रेमसंबंध गावात चर्चेचा विषय झालेले होते.

दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांकडून त्यांच्या या प्रेमसंबंधावर अनेकदा त्यांना समजावून सांगण्यात आले मात्र त्यांच्यात काडीचाही बदल झाला नाही. मयत व्यक्तीची पत्नी अखेर त्याला वैतागून माहेरी निघून गेली तर माधीबाई ही देखील तिचे घर सोडून त्याच्याकडे राहायला आली.

बायको घरातून निघून गेल्यानंतर माधाराम याने त्याच्या प्रेयसीला बोलावून घेतले आणि त्यानंतर दोघांनी आधी दारू पार्टी केली त्यानंतर सोशल मीडियावर एकमेकांचे चुंबन घेत असल्याचे व्हिडिओ बनवले आणि ते इंस्टाग्रामवर शेअर केले सोबतच आपल्या पत्नीला देखील हा व्हिडिओ त्याने पाठवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. बारमेर जिल्हा मुख्यालयाच्या शासकीय रुग्णालयात त्यांचे सर्व विच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात अखेर देण्यात आले.