ती मित्राबरोबर बोलतेय म्हणून ‘ रूममेट ‘ बाहेर गेली अन आली तर..

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद येथे समोर आलेली असून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ पदवी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेतलेला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीला आलेली असून घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केलेला असून फॉरेन्सिक लॅबकडे तो पाठवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, युक्ती सुशील बुजाडे ( वय 24 राहणार त्रिमूर्ती नगर जिल्हा चंद्रपूर ) असे मयत तरुणीचे नाव असून मंगळवारी सकाळी कॉलेजला ती गेल्यानंतर पुन्हा वसतिगृहात परतली होती. मित्रासोबत फोनवर बोलत असल्यामुळे ती तिची रूममेट असलेली दुसरी तरुणी बाहेर निघून गेली त्यानंतर ती परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तिला शंका आल्यानंतर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना तिने सांगितले. कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी तिने गळफास घेतलेला होता.

युक्ती ही उच्चभ्रू कुटुंबातील असून तिचे वडील शिक्षण संबंधित एका संस्थेत मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर काका पोलीस विभागात गोव्यात काम करतात . 13 तारखेला तिचा वाढदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला होता पोलिसांनी रूममध्ये दाखल होत तपासणी केली त्यावेळी तिथे कुठेही सुसाईड नोट आढळून आणली नाही. तिच्या मृत्यू मागचे कारण हे मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच समोर येण्याची चिन्हे आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.