प्रेम सिद्ध करण्यासाठी ‘ प्रायव्हेट पार्ट ‘ वर चक्क.., नाशिकमध्ये तरुणाला बेड्या

प्रेमसिद्ध करण्यासाठी कोणी काय करावं याचा काही नेम नाही. प्रियकराने आपल्याकडे काय मागावे किंवा प्रेयसीने आपल्याकडे काय मागावे याचा काही भरोसा राहिलेला नाही असाच एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार नाशिक येथे समोर आलेला असून एक प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या प्रेमात इतके अखंड बुडाले होते की त्यानंतर त्यांनी लग्नाचा देखील निर्णय घेतला मात्र प्रेम सिद्ध करण्यासाठी या प्रियकराने प्रेयसीला जे काही करायला लावले ते ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाणार हे नक्की..

उपलब्ध माहितीनुसार, अवेंद्र सोनवणी असे या प्रियकराचे नाव असून त्याने त्याच्या प्रेयसीकडे एक अचाट मागणी केलेली होती. त्याने तिला जर तुझे माझ्यावर खरोखर प्रेम असेल तर तुझ्या प्रायव्हेट पार्टवर माझे नाव लिही असे सांगत चक्क या तरुणीच्या छातीवर आणि हातावर देखील त्याचे नाव लिहिण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्याचा हा व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

अवेंद्र याच्या या व्हिडिओची नाशिक परिसरात जोरदार चर्चा झाली मात्र तरुणीचा यामुळे मोठ्या प्रमाणात अपमान झाला आणि तिला समाजात खाली पाहण्याची वेळ आली. तात्काळ तिने या तरुणाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलेली असून त्यानंतर अवेंद्र याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार विनयभंग यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आपल्याला देखील घरी आई बहीण आहेत याचे तरी भान या विकृत व्यक्तीने कमीत कमी ठेवणे गरजेचे होते असा देखील संताप त्याच्या विरोधात आता सोशल मीडियात व्यक्त केला जात आहे.