पुण्यात सात जणांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणारी ‘ ती ‘ विवाहिता कोण ?

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक दौंड परिसरात उघडकीला आलेली असून एकाच कुटुंबातील सात जणांचे भीमा नदी पात्रात मृतदेह आढळून आलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील तीन मृतदेह हे लहान मुलींचे आहेत. सदर कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या मुलाने एका विवाहित महिलेला पळवून नेलेले होते त्यामुळे कुटुंबाची बदनामी होईल आणि गरीब कुटुंबीय असल्याने आपल्याला पुढे जगणे अवघड होईल या भीतीने त्या तरुणाचे वडील आई जावई बहीण आणि त्यांची तीन मुली या सर्वांनी भीमा नदी पात्रात आत्महत्या केली आहे. तरुणाचे वडील हे पारनेर तालुक्यातील निघोज येथे उस्मानाबाद जिल्ह्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले होते.

मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) , संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे असून इतर तीन मुली अल्पवयीन आहेत. मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून सर्वजण निघाले आणि त्यानंतर शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह आढळून आले. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या कि घातपात याविषयी देखील चर्चा सुरु होती मात्र आत तरी हा आत्महत्येचा प्रकार दिसून येत आहे.

मयत व्यक्तीचा मुलगा अमोल याने एक विवाहित महिला पळवून नेली होती. त्याला त्याचे वडील तिला तिच्या घरी सोडून ये असे सांगत होते मात्र तो ऐकत नव्हता त्यामुळे कुटुंबाच्या मनात बदनामीची भीती बसली आणि वडिलांसह अन्य ६ जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील तात्पुरते रहिवासी असलेल्या या कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पळवून आणलेली विवाहिता ही पवार कुटुंबीयांच्याच नात्यातील महिला असून त्यामुळे पवार कुटुंबीयाला नातेवाईकांमध्ये आपली बदनामी झाल्याची भावना होती त्यातून ते त्यांच्या मुलाला तिला पुन्हा तिच्या सासरी सोडण्याचा आग्रह करत होते मात्र त्यासाठी मुलगा तयार होत नव्हता. हतबल झालेल्या वडिलांनी अखेर त्याला आम्ही सगळेजण आता आत्महत्या करू असा इशारा दिला होता मात्र त्याचा मुलावर काहीही परिणाम झाला नाही त्यामुळे या कुटुंबाने अखेर आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि पारनेरवरून दौंडला जात नदीपात्रात आत्महत्या केली. लहान मुलींना आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत याची जाणीवही नव्हती त्यामुळे कुटुंबाच्या या प्रकारात त्यांना नाहक त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे.


Spread the love