देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून मध्य प्रदेशातील जबलपूर येथे चक्क एका 92 वर्षीय वृद्ध महिलेवर घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात ही घटना उघडकीला आलेली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही जबलपूरवरून षडोल शहडोल येथे आलेली होती त्यानंतर बसची वाट पाहत बस स्थानकावर महिला उभी असताना आरोपी तिथे आला आणि त्याने तिला घरी सोडतो असे सांगत गाडीवर बसवले . त्यानंतर गाडी त्याने जंगलात नेली आणि दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून फरार झाला . परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात आला त्यावेळी ही महिला अर्धमेल्या अवस्थेत आढळून आलेली होती. पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेत आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.