फसवणुकीचा प्रकार पाहून पोलिसही अचंबीत , मंदिरात घडलाय प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून गुप्तदान देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध व्यक्तीच्या तब्बल साडेतीन लाखांच्या दागिन्यावर एका व्यक्तीने हात साफ केलेला आहे. शनिवारी सदर प्रकार उघडकीला आलेला असून अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. फसवणुकीचा प्रकार पाहून पोलीस देखील अचंबित झाले.

उपलब्ध माहितीनुसार, 67 वर्षीय आजोबा मुंबईतील विक्रोळी पूर्व परिसरात राहतात. 14 तारखेला ते एका मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले असताना त्यांच्यासोबत त्यांचा नातू देखील होता. खरेदी केलेले सामान घेऊन नातू घरी निघून गेला त्यानंतर ते घरी जात असताना साईबाबा मंदिराजवळ एका व्यक्तीने त्यांना थांबवले आणि आपल्याला साईबाबा मंदिरात गुप्त दान करायचे आहे कुणाला काही सांगू नका असे म्हणत त्यांना मंदिरात घेऊन गेला.

मंदिरात गेल्यानंतर आरोपी व्यक्तीने आपल्या खिशातील काही रक्कम काढली आणि हे पैसे देवाजवळ ठेवले त्यानंतर सोबत असलेल्या झेंडूची काही फुले त्यावर ठेवली काही वेळासाठी त्याने आजोबांना हातातील अंगठ्या आणि गळ्यातील सोनसाखळ्या काढून त्यावर फुलांसोबत ठेवा असे देखील सांगितले त्याच्या बोलण्यावर आजोबांनी विश्वास ठेवला आणि आपले साडेतीन लाख रुपयांचे दागिने तिथे ठेवले. आरोपी व्यक्तीने यावेळी आजोबांना अगरबत्ती घेऊन येतो असे सांगत तेथून पळ काढला त्यानंतर आजोबांनी त्याने दिलेली पिशवी पाहिली त्यावेळी दागिने त्यात नव्हते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.


Spread the love