अटक केलेल्या ‘ ह्या ‘ व्यक्तीने केलाय कल्पनेपलीकडचा गुन्हा , कारनामे असे की ..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या नवी दिल्ली येथील एका प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून एका हॉटेल चालकाची बंटी बबली पद्धतीने फसवणूक करण्यात आलेली आहे . अबुधाबी येथील राजघराण्यातील आपण व्यक्ती आहोत असे सांगत या व्यक्तीने दिल्लीतील एका आलिशान हॉटेलमध्ये चार महिने मुक्काम ठोकला होता त्यानंतर त्याचे 23 लाख रुपयांचे बिल झाले आणि तो अचानकपणे गायब झाला. अटक केल्यानंतर हा व्यक्ती लक्झरी लाइफस्टाइलचा फॅन असल्याचे समोर आले असून महागडी हॉटेल्स, महागड्या वस्तू यांचा तो शौकीन असल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, मोहम्मद शरीफ असे या भामट्याचे नाव असून लीला पॅलेस हॉटेल व्यवस्थापन यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . एक ऑगस्ट 2022 रोजी त्याने लीला पॅलेस इथे एक खोली घेतलेली होती त्यानंतर ऑगस्टपासून तर नोव्हेंबरपर्यंत त्याने पैसे दिले नाही आणि त्यानंतर खोलीतील चांदीची भांडी आणि मोत्याचा ट्रे देखील तो घेऊन गायब झाला. आपण व्यवसायासाठी भारतात आलेलो आहोत असे देखील त्याने सांगितले होते. त्याच्या राहणीमानावरून तो उच्चभ्र कुटुंबातील वाटायचा त्यावरून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची देखील फसगत झाली आणि अखेर त्याने एके दिवशी पलायन केले .

पोलिसांनी अखेर कारवाई करत त्याला अटक केलेली आहे. पोलीस त्याचा शोध घेत असताना तो कर्नाटकातील दक्षिण कन्नड येथील रहिवासी असल्याची बाब समोर आलेली आहे. आपण अबुधाबीच्या राजघराण्यातील आहोत असे सांगत त्याने हॉटेलमध्ये रूम मिळवली होती. त्याची राहणीमानाची शैली पाहता त्याच्या वर्तनावर कुणाला शंका आली नाही म्हणून त्याने तब्बल चार महिने तिथे मुक्काम ठोकला अन 20 नोव्हेंबर रोजी व्यवस्थापनाला चेक दिला आणि त्यानंतर तिथून तो निघून गेला मात्र त्याचा चेक बाउन्स झाला अन त्यानंतर व्यवस्थापनाने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


Spread the love