म्हणून माझ्या मुलीलाही सोबत घेऊन जातेय , महिलेच्या सुसाईड नोटमध्ये

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती इथे समोर आलेली असून ‘ आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलीची जबाबदारी कोण घेणार म्हणून तिला देखील सोबत घेऊन आत्महत्या करत आहोत ‘ असे म्हणत अशी चिठ्ठी लिहून एका महिलेने आत्महत्या केली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोकाकुल वातावरण झालेले आहे .

अमरावती शहरातील स्थानिक खोलापुरी गेट इथे ही घटना उघडकिस आलेली असून भाग्यश्री दीपक भले ( वय 35 ) आणि स्वरा दीपक भले ( वय दहा ) अशी मायलेकींची नावे आहेत. भाग्यश्री या आर्थिक परिस्थिती खराब असल्याकारणाने धुणी भांडी करून कुटुंबाची गुजराण करत होत्या. आपल्या मुलीसह त्या माहेरी राहत होत्या तेव्हापासून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झालेली होती.

पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिथे सुसाईड नोट आढळून आली त्यामध्ये आयुष्याला कंटाळून आपण आत्महत्येचा निर्णय घेत आहोत त्याची चौकशी देखील करू नये आणि कुणालाही दोष देऊ नये. माझ्या मुलीला मी कुणाच्या जबाबदारीवर सोडू शकत नाही. माझ्या मृत्यूनंतर तिचे काय होणार या काळजीपोटी मी तिला देखील सोबत घेऊन जात आहे, असे या नोटमध्ये म्हटलेले आहे.


Spread the love