‘ देखना सबसे जादा भीड मेरे जनाजे पे होगी ‘, स्टेटस ठेवले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक दुर्दैवी घटना औंढा नागनाथ येथे समोर आलेली असून एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर स्टेटसला ठेवलेल्या मजकुराची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘ अभी जिंदा हू तो अकेला हू .. पर देखना जब मरुंगा तक सबसे जादा भीड मेरे जनाजे पे होगी ‘ असे स्टेटस ठेवून या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याचे वय अवघे 18 वर्षे असून परिसरात त्याच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राम केशव घुगे ( वय १८ वर्षे ) असे या तरुणाचे नाव असून शनिवारी सकाळी तो पिकाची फवारणी करण्यासाठी पंप घेऊन गेलेला होता त्यानंतर अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातून गेल्यापासूनच त्याचा फोन बंद अवस्थेत येत होता.

आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास त्याने व्हाट्सअपवर स्वतःचे स्टेटस बदलून ‘ अभी जिंदा हू तो अकेला हू .. पर देखना जब मरुंगा तक सबसे जादा भीड मेरे जनाजे पे होगी ‘ असे केले होते आणि त्यानंतर लगेच त्याने त्याचा फोन बंद केला. त्याचे व्हाट्सअप स्टेटस पाहिल्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी शेतात तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.


Spread the love