कला केंद्रावर पुन्हा कारवाई , पोलीस पोहचले तेव्हा चक्क..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता ग्रामीण पातळीवर देखील कला केंद्र सुरू झालेली असून कला केंद्राच्या नावाखाली जिथे भलतेच प्रकार चालत असल्याची देखील त्या त्या गावांमध्ये चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील अंबासागर परिसरात निलंबोघाट इथे चालणाऱ्या एका कला केंद्रावर शनिवारी संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने छापा टाकलेला असून तिथे तब्बल 18 महिला डान्स करताना आढळून आलेल्या आहेत. कला केंद्राच्या तीन व्यवस्थापक व्यक्तींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

आंबासाखर वाघाळा परिसरात पायल कला केंद्र असे या कला केंद्राचे नाव असून गेल्या अनेक महिन्यांपासून तिथे हा उद्योग सुरू होता. परिसरातील अनेक नागरिकांना या संदर्भात कल्पना देखील होती त्यानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास धडक कारवाई केली त्यावेळी तब्बल 18 महिला ग्राहकांसमोर डान्स करताना आढळून आल्या.

पोलिसांनी व्यवस्थापक यांच्याकडे परवाना संदर्भात चौकशी केली त्यावेळी त्याने आपल्याकडे कुठलाही परवाना नाही असे सांगितल्यानंतर पोलिसांनी कला केंद्रातील साहित्य जप्त करून संतोष नरहरी काशीद ( राहणार मोरेवाडी अंबाजोगाई), सय्यद तीलावत सय्यद अक्सर आली ( राहणार सायगाव तालुका अंबाजोगाई) आणि संतोष लक्ष्मण कोळंबे ( राहणार मंगळवार पेठ अंबाजोगाई ) या तिघांना ताब्यात घेतलेले आहे.


Spread the love