सोशल मीडियावर सध्या एका अल्पवयीन मुलीच्या बुद्धिमत्तेची जोरदार चर्चा असून तिला जिल्हाधिकारी बनायचं आहे. जिल्हाधिकारी म्हणून देशाची सेवा करण्याचे तिचे स्वप्न असून तिने त्यासाठी चक्क भारताची राज्यघटना पूर्णपणे पाठ केली आहे. आपण फक्त क्रमांक सांगितला तर ती संबंधित कलम कशाविषयी आहे याच्याविषयी इत्यंभूत माहिती देते. विशेष म्हणजे या मुलींचे वय तेरा वर्षे असून जळगावची ती रहिवासी आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अलिजा मुजावर ( वय तेरा ) असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता सातवीत शिकते. पाळधी इथे ती एका शाळेत ते शिकत असून लहानपणापासूनच जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागेल याची देखील तिला जाणीव असून तिने कायद्याचा मूळ गाभा असलेली राज्यघटना तोंडपाठ करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसात संपूर्ण राज्यघटना देखील पाठ केली.
तिची परीक्षा घेणाऱ्या व्यक्तीने फक्त कलम नंबर सांगितला की आलीजा त्यामध्ये काय लिहिलेले आहे यासंदर्भात झटपट माहिती देते. निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे अविनाश जावळे यांचे मार्गदर्शन तिला मिळत असून ती गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील हातमजुरी करत असून आई ही गृहिणी आहे. इतक्या अल्पवयात राज्यघटना तोंडपाठ झाल्याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.