महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत येत असून मुंबई येथे एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला आहे. परिसरातील एका गतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला आणि त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील अपलोड केला. घाटकोपर परिसरात ही घटना घडलेली असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी ही स्वच्छतागृहात गेलेली होती त्यावेळी हे तीन जण तिच्यापाठोपाठ तिथे गेले आणि तिला पकडून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि तितक्यावर त्यांचे समाधान झाले नाही तर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला . पीडित मुलीच्या भावाला याप्रकरणी माहिती मिळताच त्याने कुटुंबीयांना सांगितले आणि त्यानंतर कुटुंबीयांनी घाटकोपर पोलिसात या अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तीनही जणांना ताब्यात घेतलेले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केलेली आहे.