शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना कात्रज परिसरात उघडकीला आलेली असून लग्नानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून रेडिओलॉजी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. कात्रज येथे ही घटना उघडकीला आलेली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अविनाश कुरेवार असे आरोपी पतीचे नाव असून त्याची पत्नी समीक्षा राहुल माने असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. समीक्षा ही मूळची यवतमाळ जिल्ह्यातील असून यवतमाळ येथे एका रुग्णालयात नोकरी करत असताना तिची आरोपी व्यक्तीसोबत मैत्री झालेली होती त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा देखील निर्णय घेतलेला होता. समीक्षा हिच्या घरातून विवाहाला विरोध झाला नाही मात्र आधी स्वतःच्या पायावर उभे रहा आणि त्यानंतर विवाह करा असे सांगितले आणि त्यानंतर समीक्षा शिक्षणासाठी पुण्यात आलेली होती.
पुण्यात आल्यानंतर समीक्षा हिने आरोपी व्यक्तीसोबत आई-वडिलांना अंधारात ठेवत विवाह केला त्यानंतर आरोपी अविनाश हा वारंवार तिच्या आई-वडिलांना फोन करून दमदाटी करत समीक्षा हिला मारहाण करत होता. त्यानंतर तो तिला टाळू देखील लागला त्यानंतर आठ जानेवारी रोजी अविनाश याने समीक्षा हिच्या लहान बहिणीला फोन करून एक नंबर पाठवला आणि त्यावर कॉल करण्यास सांगितले. बहिणीने कॉल केला त्यावेळी समोरच्या व्यक्तीने समीक्षा हिने आत्महत्या केलेली असल्याचे सांगितले. समीक्षा हिच्या कुटुंबीयांनी पुण्यात दाखल होत तिचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.