‘ व्हॅलेंटाईनच्या आधी बॉयफ्रेंड असणे आवश्यक ,’ कॉलेजबाहेर नोटीस

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका कॉलेजच्या बाहेर नोटीस बोर्डवर लावलेल्या एका नोटीसची जोरदार चर्चा सुरू झालेली असून ओरिसातील जगतसिंग पुरी जिल्ह्यात एका महाविद्यालयाच्या संस्थेने ‘ सर्व विद्यार्थिनींना 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवसाच्या आधी बॉयफ्रेंड असणे आवश्यक आहे ‘ असे निर्देश दिलेले आहेत. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर हा प्रकार कोणीतरी खोडसाळपणा केलेला असल्याचे समोर आले असून सदर नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. चक्क प्राचार्य यांची बनावट सही या नोटीसवर ठोकण्यात आलेली आहे.

प्राचार्य विजयकुमार पात्रा यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘ काही उपद्रवी तत्त्वांनी ही नोटीस व्हायरल केलेली आहे. आमच्या महाविद्यालयाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे सर्व केले गेलेले असून चक्क आपल्या स्वाक्षरीचा देखील गैरवापर करण्यात आलेला आहे असेही म्हटलेले आहे. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून लवकरच पोलीस आरोपींना जेरबंद करतील यावर आम्हाला विश्वास आहे असेही त्यांनी म्हटलेले आहे.


Spread the love