पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना आळेफाटा परिसरात उघडकीला आलेली असून जिप गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर व्यवहारात पैशावरून झालेल्या वादात एका टुरिस्ट व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलेला आहे. 24 तारखेला रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडलेली असून खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने देखील स्वतःवरही वार करून घेतलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, संतोष बबन गोडसे ( वय 42 राहणार पिंपळवंडी ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यानंतर आरोपी असलेला मयूर अशोक सोमवंशी याने स्वतःवर देखील वार करून घेतले. व्यवहारात झालेल्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे पुढील तपास करत आहेत.