महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार कोल्हापूर येथे समोर आलेला असून शाहूपुरी येथील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये सेंटर चालकाने कामाच्या पहिल्याच दिवशी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवारी 24 तारखेला सकाळी ही घटना उघडकीला आलेला असून एका व्यक्तीच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, धैर्यशील विश्वास काटकर ( वय 40 राहणार नागाळा पार्क कोल्हापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिलेली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार कॉम्प्युटर सेंटरमध्ये आपण नोकरीसाठी मुलाखत दिलेली होती आणि त्यानंतर आपले सिलेक्शन झाल्यावर मंगळवारी नोकरीचा पहिलाच दिवस होता. सेंटर चालक असलेला धैर्यशील काटकर हा कामकाज दाखवण्यासाठी म्हणून दुसऱ्या मजल्यावर आपल्याला घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने आपल्यासोबत अश्लील वर्तन केले.
सदर प्रकाराने महिला घाबरून गेली आणि त्यानंतर आरडाओरडा करून तिने पतीला फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या पतींसह अन्य नातेवाईकही तिथे पोहोचले आणि त्यांनी काटकर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी संशयित धैर्यशील काटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.