चाळीसाव्या वर्षी तरुण प्रियकर भेटला अन महिलेची ‘ नियत ‘ बदलली..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती. एका महिलेने आपल्या पहिल्या प्रियकराचा खून करण्यासाठी दुसऱ्या प्रियकर याची मदत घेतली आणि त्यानंतर १९ जानेवारीला तिने त्याचा खून केलेला होता. बीड शहरातील पालवण चौक येथे ही घटना उघडकीला आलेली होती त्यानंतर महिलेचा दुसरा प्रियकर आणि ती यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या. त्यांच्या पोलीस कोठडीत आता दोन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कविता आजिनाथ इंगळे ( वय 40 राहणार पालवण चौक बीड ) आणि सतीश जाधव ( वय 26 राहणार जाधव वाडी अंबिका चौक बीड ) अशी या प्रेमी युगुलांची नावे असून या दोघांनी कविता हिचा पहिला प्रियकर दत्तात्रय राधाकिसन इंगळे ( राहणार बीड ) याचा अत्यंत अमानुषपणे खून केलेला होता आणि त्यानंतर तेथून पलायन केले होते मात्र पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या .

दोन वर्षांपासून दत्तात्रय आणि कविता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पालवन चौक परिसरात राहत होते त्यानंतर कविता हिचे सतीश जाधव यांच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि त्यानंतर तिने तिचा पहिला प्रियकर दत्तात्रय याचा 19 जानेवारी रोजी आठ हजारांची सुपारी देऊन खून केलेला होता. सतीश याने मित्रांना सोबत घेत हा खून केला त्यानंतर जयश्री इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कविता आणि तिच्या प्रियकरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love