येरवड्यातून ‘ तो ‘ शिक्षक धरला , कोंढव्यातील शाळेत घडला होता प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे शहरात उघडकीला आलेली असून शाळेत अल्पवयीन मुलींना व्हाट्सअपवर आय लव यू असा मेसेज पाठवून जबरदस्तीने त्यांचे चुंबन घेणाऱ्या एका खेळाच्या शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे. शाळेत झालेल्या गुड टच बॅड टच या कार्यक्रमात एका मुलीने शिक्षकांबद्दल ही तक्रार केली आणि त्यानंतर इतर ही मुलींनी पुढे येऊन आमच्याशी देखील हा व्यक्ती असेच वर्तन करत असल्याचे सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, अविशान गोविंद चिलबेरी ( वय 23 राहणार येरवडा ) असे या शिक्षकाचे नाव असून एका समुपदेशक महिलेने त्याच्या विरोधात कोंढवा पोलिसात फिर्याद दिलेली होती. कोंढवा इथे एका शाळेत हा प्रकार घडलेला असून त्याने शाळेतील तीन मुलींना व्हाट्सअपवर आय लव यू असे मेसेज पाठवले होते त्यानंतर शाळेत त्यांना जबरदस्तीने पकडून त्यांचे चुंबनदेखील घेतले असे देखील पीडित मुलींचे म्हणणे आहे .


Spread the love