महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना नागपूर इथे उघडकीस आली आहे. मित्राच्या घरी गेल्यानंतर आरोपीने त्याच्या बायकोशी जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ‘ आपण लग्न करू ‘ अशी बतावणी करत तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबध प्रस्थापित केले. अखेर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वाठोडा पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अभय सुरेश जयस्वाल (२८, राजेंद्रनगर, नंदनवन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे आपण फक्त टाईमपास करत होतो, असे देखील आरोपी म्हणत आहे .
काय आहे प्रकरण ?
पीडित ३० वर्षीय महिला रिया ( बदललेले नाव ) हिच्या पतीची अभय जयस्वाल याच्यासोबत मैत्री होती. अभय आणि रिया एकाच इंशुरन्स कंपनीत नोकरीला आहेत तसेच रिया हिचा पती देखील अभय याचा मित्र असल्याने त्याचे रियाच्या घरी जाणे येणे होते . मित्राला भेटायला म्हणून तो वारंवार रिया हिच्या घरी येऊ लागला तसेच रिया व तिच्या पतीत काही वाद झाला तर तो मध्यस्थी देखील करत होता. रियाला पाच वर्षांचा मुलगा आहे तर अभय अविवाहित आहे. .
मित्राचा अभय त्याच्यावर विश्वास असल्याने त्याला मित्राबद्दल संशय आला नाही याचाच फायदा घेत आरोपी अभय याने रियाशी जवळीक साधली. मित्र घरी नसताना देखील तो तिच्या घरी यायला लागला त्यामुळे रिया आणि अभयची मैत्री जास्तच घट्ट झाली. अभयवर रियाचा विश्वास बसला आणि रियाच्या याच विश्वासाचा गैरफायदा अभयने घेत २०१९ मध्ये घरी कुणी नसताना रियाला त्याने प्रेमाची कबुली दिली आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यावेळी रियाने विवाहित असून मुलगा असल्याचे सांगितले मात्र तरीही त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा परिसरात पसरल्यामुळे रियाने कुटुंबाचा विचार करीत त्याला नकार दिला तर अभय याने ‘ तू तुझ्या पतीला सोडून दे आपण लग्न करू ‘ असे सांगत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. १५ नोव्हेंबर रोजी रियाने त्याला आपल्या घरी बोलावून लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने स्पष्टपणे नकार देत ‘मी फक्त टाईमपास करीत होतो’ असे म्हटल्याने महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली . महिलेच्या म्हणण्यानुसार तब्बल तीन वर्षे आरोपीने तिचे लैंगिक शोषण केलेले आहे.