महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवर अनेक तरुणांना लग्नासाठी योग्य वधू मिळत नसल्याने या क्षेत्रात एजंट लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. अनेक एजंट लोकांनी विवाहित महिलांची देखील पुन्हा लग्न लावलेली असून कायदे महिलांच्या बाजूने असल्याचा फायदा घेत अशा स्वरूपाची गुन्हेगारी करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे समोर आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्योती धनंजय लोंढे ( वय 38 राहणार वाघोली पुणे ) या महिलेने दोन लाख रुपये घेऊन विवाह केल्यानंतर बोगस नववधूला घेऊन पोबारा केला त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केलेली असून वाघोली येथील राहत्या घरातून तिला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
तक्रारदार रवींद्र उत्तम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिलेली असून लग्न जमवण्यात मध्यस्थ म्हणून काम केलेले संशयित एजंट सचिन जगन्नाथ रासकर ( राहणार इस्लामपूर), अर्चना भरत शिंदे ( राहणार वाघोली पुणे ), सोनाली राव शाकाळे, अर्चना मास्तर सावंत ( दोघेही राहणार पुणे ) आणि बेबी जान बाबू शेख ( राहणार वाळवा ) या सहा जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .