लव्ह जिहादची तक्रार दे नाहीतर.. , भररस्त्यात तरुणीला अडवले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक वेगळाच प्रकार सध्या समोर आलेला असून अलिबाग परिसरात एक तरुणीला अडवत ‘ तू लव्ह जिहादची तक्रार दे नाहीतर तुला जीवे मारू ‘ असे सांगत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आलेली आहे. भररस्त्यात हा प्रकार घडलेला असून श्रीवर्धन म्हसळा रोडवर ही घटना घडलेली आहे. पोलिसांनी त्यानंतर महादेव पाटील आणि इतर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आणि साक्षीदार हे श्रीवर्धनवरून म्हसळाकडे मोटरसायकलवरून जात असताना सात जणांनी त्यांची मोटर सायकल अडवली आणि महिलेला तुमची काय फालतुगिरी चालू आहे ? असे सांगून तिच्या चेहऱ्यावरील स्कार्प काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर फिर्यादी यांच्यासोबत असलेले साक्षीदार यांच्या विरोधात तू लव्ह जिहादची तक्रार दे असे म्हणत त्यांनाही मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत म्हटलेले आहे.


Spread the love