बाराव्या मजल्यावरील महिला सकाळी गायब , बिल्डिंगखाली गर्दी जमली अन ..

Spread the love

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक अशी घटना मुंबई येथील उच्चभ्रू परिसर असलेल्या गोरेगाव पश्चिम येथे समोर आलेली होती. लक्ष्मी नगर परिसरात एका उंच इमारतीच्या आवारात बुधवारी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता. नेपाळ येथील ही महिला असून पोलीस तपासात तिने आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कृषीका थापा ( वय 30 ) असे मयत महिलेचे नाव असून तिने गुलराज टावर या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. एका स्पा सेंटरमध्ये ती काम करत असून ती तिचा पती शिजानो थापा याच्यासोबत या फ्लॅटमध्ये राहत होती. त्यांच्यासोबत तिची एक मैत्रीणदेखील राहायची. तिच्या मैत्रिणीने बुधवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिचा शोध सुरू केला मात्र ती आढळून आली नाही याचवेळी तिला खाली एक मृतदेह सापडल्याची बातमी समजली आणि हा मृतदेह अखेर कृषिका हीचाच असल्याचे समोर आले.

पोलीस तपासात कृषीका आणि तिचा पती यांच्यात सतत वाद होत होते. घटना घडली त्या रात्री कृषीका आणि तिच्या पतीचे भांडण झालेले होते. मैत्रीण रात्रपाळी करून कामावरून आली होती त्यानंतर सकाळी जाग आली तेव्हा कृषीका आणि तिचा नवरा हे दोघेही घरात आढळून आले नाहीत . पोलीस प्रकरणाचा सध्या तपास करत असून प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याची चर्चा आहे मात्र या प्रकरणात इतरही काही अँगल आहे का ? याचा पोलीस सध्या शोध घेत आहे.


Spread the love