‘ मला खायला दे नाहीतर ‘, पुण्यात दोस्ताच्या कानाचा तुकडाच पाडला

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मित्राने जेवायला दिले नाही म्हणून दुसऱ्या मित्राच्या कानाचा चावा घेऊन चक्क त्याचा कान तोडण्यात आल्याचा प्रकार मार्केट यार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेला आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अनिकेत कांबळे ( वय 35 राहणार कात्रज ) असे आरोपीचे नाव असून सचिन कुंभार ( वय 39 ) यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दिलेली आहे. सचिन कुंभार आणि अनिकेत कांबळे हे जिवलग मित्र असून कात्रज भागात सोबत राहतात. सचिन कुंभार 27 तारखेला मार्केट यार्ड येथे एका पार्किंगमध्ये यांच्या मैत्रिणीसोबत बोलत होते त्यावेळी अनिकेत तिथे आला आणि ‘ मला एक तर खायला दे नाहीतर तू माझ्यासोबत जेवायला चल ‘ असे म्हटले त्यानंतर सचिन यांनी त्याला समजावले.

मैत्रिणीच्या समोर सचिन यांनी नकार दिल्यानंतर आरोपी अनिकेत याचा राग अनावर झाला आणि त्याने त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यांच्या शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झाले आणि प्रकरण मारामारीपर्यंत गेले त्यावेळी अनिकेत कांबळे याने सचिन यांना बाजूला ओढत चक्क त्यांच्या कानाचा चावा घेतला आणि कानाची पाकळी तोडली. रक्तबंबाळ अवस्थेत सचिन यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात आरोपी अनिकेत कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे .


Spread the love