सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून मद्यधुंद अवस्थेत मुंबई विमानतळावर रिक्षा पिकप पॉईंट इथे धिंगाणा घालणाऱ्या दिल्लीतील एका महिलेला पोलिसांनी हटकले त्यावेळी तिने पोलिसांनाच मारहाण केली आणि संतप्त अवस्थेत तिने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे केस उपटून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि पोलिसाच्या हाताचा चक्क चावा घेतला. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रूपाली जितेंद्र कुमार ( वय 34 ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती मूळची दिल्ली येथील रहिवासी आहे. गुरुवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास ती मद्यधुंद अवस्थेत रिक्षा पिकप पॉईंटवर आलेली होती आणि तिथे धिंगाणा घालत होती. याच वेळी विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला अटकाव केला त्यावेळी तिने सुरक्षारक्षक महिलेच्या हाताचा चावा घेतला. पोलिसांनी तिला कसेबसे ताब्यात घेतले आणि मात्र याच दरम्यान तिने सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देखील शिवीगाळ केली.
आरोपी महिलेने लाथा बुक्क्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली तसेच महिला अंमलदार यांच्या डोक्यावर मोबाईल फेकून मारला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले . पोलिसांनी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवून तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 332, 353 आणि 506 अंतर्गत पोलीस कर्मचार्यांवर हल्ला करणे आणि गुन्हेगारी धमकावणे यासाठी गुन्हा दाखल केला. “आम्ही रूपाली जितेंद्र कुमार विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे,” असे दीक्षित गेडाम, पोलिस उपायुक्त (झोन 8) यांनी सांगितले आहे.