गूढ उलगडलं..अँजिओप्लास्टी करूनही आजोबांचा ‘ नाद ‘ सुटेना अन अचानक..

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची जोरदार चर्चा असून बंगळूर येथील हे प्रकरण आहे. पोलिसांना रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. मयत व्यक्तीचे वय 67 च्या दरम्यान असून त्याचा मृत्यू कसा झाला ? याचा पोलीस शोध घेत असतानाच अनेक खळबळजनक घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्या आणि त्यानंतर या व्यक्तीच्या घरी काम करत असलेल्या एका मोलकरणीपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जाऊन पोहोचले.

उपलब्ध माहितीनुसार, जे पी नगर परिसरात हा व्यक्ती राहत असून बालसुब्रमण्यम असे त्याचे नाव आहे. 17 नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या कडेला तो मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर पोलीस तपासात तो एक दिवस आधी घरातून गेल्याचे समोर आले. आपल्या नातवाला बॅडमिंटन खेळण्यासाठी त्याने सोडले आणि त्यानंतर घरातील व्यक्तींना त्याने फोन करून मला जरा घरी येण्यास उशीर होणार आहे असे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन देखील बंद आला आणि तो मयत अवस्थेत आढळून आला.

कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी या व्यक्तीचे त्याच्या घरी कामाला येणाऱ्या एका मोलकरणीसोबत प्रेमसंबंध होते आणि त्यानंतर तो तो वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध देखील ठेवायचा हे देखील समोर आले. पोलिसांनी त्यानंतर मोलकरणीला ताब्यात घेतले त्यावेळी तिने जो काही खुलासा केला तो ऐकून पोलीसही हैराण झाले. मयत वृद्ध व्यक्तीची अवघ्या एक वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाल्याचे देखील समोर आलेले असून वयाच्या 67 व्या वर्षी त्याला म्हातारचळ लागलेला होता.

मोलकरणीने सांगितले की, ‘ त्याने त्याच्या नातवाला बॅडमिंटन खेळण्यासाठी क्लासमध्ये सोडले आणि त्यानंतर तो आपल्या घरी आला. आपण त्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करतो. त्याने वेळोवेळी आपल्याला आर्थिक मदत करत आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहे. घरी आल्यानंतर अशाच पद्धतीने तो आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता मात्र याचवेळी त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यात तो जागीच मयत झाला. त्यानंतर आपण आपला भाऊ आणि नवरा यांच्या मदतीने त्याला घराबाहेर आणले आणि एका चादरीत बांधून रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह टाकून दिलेला होता . ‘


Spread the love