बागेश्वरबाबाला अखेर झाली उपरती , हात जोडून म्हणतोय की ?

मध्य प्रदेशातील बागेश्वरधाम येथील बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज सध्या चांगला चर्चेत असून संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियात या बाबाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी देखील आपला संताप व्यक्त केल्यानंतर अखेर या बाबाला उपरती झालेली असून त्याने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. सुरुवातीला आक्षेपार्ह वक्तव्य करायची आणि त्यानंतर माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा असे प्रकार देशात सध्या सुरू झालेले आहेत.

बागेश्वर बाबा याने माफी मागताना, ‘ संत तुकाराम महाराज हे महान संत आहेत. ते आपले आदर्श आहेत .आपल्याला कुणाच्याही भावना दुखायच्या नव्हत्या . आपण एका पुस्तकात ही गोष्ट वाचलेली होती त्याचा उल्लेख आपण केला पण मी माझे शब्द मागे घेतो. संत तुकारामांच्या पत्नी त्यांना एकदा ऊस आणायला पाठवतात मात्र ऊस आणल्यानंतर त्या उसाने त्यांना मारतात त्यामध्ये उसाचे दोन तुकडे होतात ही कहाणी मी आपल्या पद्धतीने भाविकांना सांगितली पण या कहाणीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या म्हणून मी माझे शब्द मागे घेतो , ‘ असे म्हटलेले आहे.

बागेश्वरबाबा संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काय बरळला ?

महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज मारत असत. त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला तुमची पत्नी मारते तुम्हाला काहीच वाटत नाही का ? तर संत तुकाराम म्हणाले देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो तर पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची, ‘ असे विधान संत तुकाराम यांच्याबद्दल या बागेश्वरबाबाने केले होते. ( काही शब्द लिहण्याच्या पलीकडचे आहेत )

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर या बाबाने नागपूर इथून पळ काढला होता आणि समितीला रायपूर येथे येऊन आपली दिव्यशक्ती पाहण्याचे आव्हान दिलेले होते. सोशल मीडियावर सध्या धीरेंद्र शास्त्री महाराज याच्याबद्दल संतापाची लाट पाहायला मिळत असून बाबाच्या या आधीच्या अनेक वक्तव्यांची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झालेली आहे. नागपूरमध्ये या बाबाची कथा 13 जानेवारीपर्यंत होणार होती मात्र त्याआधीच 18 जानेवारीला बाबाने तिथून पळ काढला आणि इतरत्र जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आव्हान दिलेले होते.