एकेकाळी लाखो भक्तगण असलेला आसाराम हा स्वयंघोषित हा शिष्येवर बलात्कार केल्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयात दोषी ठरलेला असून त्यानंतर गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे तर त्याच्यासोबत असलेली त्याची बायको आणि इतर सहा आरोपी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
आसाराम याने त्याच्या आश्रमात राहत असलेल्या शिष्येवर 2001 ते 2006 या कालावधीत अनेकदा बलात्कार केला असा एफआयआर अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आसाराम हा दुसऱ्या एका प्रकरणात आधीच जन्मठेपेची शिक्षा भोगत असून न्यायालयात सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य करून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे.
जोधपूर येथील आश्रमात आसाराम याने 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याची एक तक्रार आश्रमातील सोळा वर्षीय शिष्येने केलेली होती . आसाराम याच्या याचे भक्त असलेल्या कुटुंबातील ही मुलगी असून या प्रकरणात सध्या तो जोधपूर येथे तुरुंगात आहे. आसाराम याचे एकेक कारनामे आता बाहेर येत असून विशेष म्हणजे अद्यापही त्याच्या समर्थनार्थ फेसबुक आणि सोशल मीडियात मोहीम चालवली जात आहे. अहमदनगर येथे तर आसाराम याला मुक्त करण्यासाठी महिलांनी आंदोलन देखील केले होते.